Satara Shivjayanti 2022 l साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी | Sakal
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (Vrushaliraje Shivajiraje Bhosale) आणि छत्रपती कौस्तुभ आदित्यराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज सकाळी अभिषेक घालण्यात आला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी पोवई नाक्यावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या भगव्या पताकांनी शिवतीर्थ अवघा भगवामय दिसत आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)